आपला जिल्हा

मुख्याध्यापक पदाकरीता अर्ज करण्याचे सैनिक कल्याण विभागाचे आवाहन

पुणे : दक्षिण मुख्यालयाअंतर्गत आशा शाळेकरीता कंत्राटी तत्वावर मुख्याध्यापक पदासाठी अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी २६ मे २०२५ अखेर अर्ज सादर करावेत.

अर्जदार प्राधान्याने पदव्युत्तर पदवी, विशेष शिक्षणात पदवीधर आरसीआय नोंदणीकृत असावा. विशेष समावेशक शाळेचे , मुख्यध्यापक , विशेष शिक्षक म्हणून पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. नियुक्तीच्या तारखेला अर्जदाराचे वय ५५ वर्षांपेक्षा कमी असावे.

इच्छुक उमेदवारांनी साध्या कागदावर अनुभवाच्या तपशीलासहित बायोडाटा, अलीकडील पारपत्र आकाराचा फोटो, अनुभव प्रमाणपत्र, प्रशस्ताऐवजांच्या प्रती तसेच संबंधित तपशीलांसह ‘आशा स्कूल, पुणे येथील मुख्याध्यापक पदासाठी अर्ज’ असे लिहिलेल्या सीलबंद लिफाफ्यात नोंदणीकृत किंवा शीघ्रगती टपालाद्वारे (स्पीड पोस्ट) संचालक, आशा शाळा, ८ जिजामाता रोड मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र जवळ, पुणे-४११००१ या पत्त्यावर अर्ज सादर करावे. अर्जासोबत सर्व शैक्षणिक पात्रता, गुणपत्रिका, अनुभव, कामगिरी यांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.

अधिक माहितीसाठी ७७७०००४५३८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल स. दै. हंगे (निवृत्त) यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker