
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या वॉर्ड रचनेच्या प्रारूप आराखड्यावर हरकती/सूचना दाखल करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य निवडणूक ElectionCommission आयोगाकडे केली आहे. सध्या हरकती नोंदवण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र, याच काळात गणेशोत्सव असल्याने संभाव्य उमेदवार आणि नागरिक सणाच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे हरकती नोंदवण्यासाठीची मुदत १० सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवावी, अशी विनंती सुळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

मुदतवाढीची गरज का?
२२ ऑगस्ट रोजी पुणे मनपाच्या निवडणुकीसाठी वॉर्ड ElectionCommission रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावर हरकती/सूचना मागवण्यासाठी केवळ १३ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या वेळेतच गणेशोत्सव येत असल्याने अनेकांना पुरेसा अभ्यास करून हरकती नोंदवणे शक्य होणार नाही, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे, नागरिकांना आणि इच्छूक उमेदवारांना योग्य हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे.
आयोगाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
सुप्रिया सुळे यांनी ElectionCommission निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की या मागणीचा गांभीर्याने विचार करून हरकती दाखल करण्याची मुदत वाढवावी. यामुळे, नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत अधिक सक्रियपणे सहभागी होण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडून यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.



