
मुंबई: मंत्रालयात आयोजित महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर समाजसुधारकांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी महापुरुषांच्या विचारधारेतूनच सामाजिक समतेचा आणि न्यायाचा मार्ग सापडतो, असे प्रतिपादन करत त्यांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात अनु. जाती/जमाती/वि.जा/ भ. /ज/इ मा व/ वि.मा. प्र. शासकीय/ निमशासकीय अधिकारी/ कर्मचारी संघटना (रजी) मंत्रालय मुंबईचे प्रसिद्धी प्रमुख प्रदीप नन्नवरे यांचा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे व पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



