ताज्या घडामोडी

मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या बायोमॅट्रीक लावा दिपक पाचपुते यांची मागणी

अहिल्यानगर : नाशिक प्रशासकीय विभाग विशेष स्थान अहिल्यानगर जिल्ह्यात फेस रिडिंग प्रणाली याची अंमलबजावणी होत नाही. मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या कामाची वेळ सकाळी ९:४५ ते संध्याकाळी ६:१५ वाजेपर्यंत आहे.मात्र वास्तव पाहता अनेक गावात ग्राम महसूल अधिकारी हे १२:०० ते ४:३० पर्यंत कार्यालयात हजर असतात अनेक वेळेस बाहेर असल्याचे संगितले जाते ते घरी असतात रजेवर असतात ते नेमके समजून येत नाही अनेक ठिकाणी कार्यालयात २ दिवसातून एकदा येतात.त्यांची विद्यमान स्थिती हजेरी हि त्यांच्या दैनंदिनी च्या आधारे वेतन अदा केले जाते असे समजते पण राज्यातील ९९% ग्राम महसूल अधिकारी हे दैनंदिनी लिहित नाहीत तहसीलदार कार्यालयात जमा होत नाहीत तहसीलदार, मंडळ अधिकारी यांच्या कडून तपासणी केली जात नाही यांचे वेतन जमा करणे योग्य नाही.

शासनाची राज्यभरातून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. जनतेचा पैसा वाया जाता कामा नये तरी तात्काळ राज्यातील ग्राम महसूल अधिकारी यांच्या बायोमॅट्रिक हजेरी सुरु करण्यात याव्यात जो पर्यंत बायोमॅट्रिक मशीन कार्यान्वित होत नाही तो पर्यंत मोबाईल अॅप वरून ऑनलाईन हजेरी अॅपमधून उपस्थिती नोंदविण्यात यावे.मुख्यालयाच्या ठिकाणी बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली / फेस रिडिंग प्रणाली या सारख्या अद्ययावत यंत्रणेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविली करण्यात यावी. ग्राम महसूल अधिकारीच्या बाबतीत ज्या कार्यालयामध्ये मौजे / सज्जा ह्या शहरी भागाच्या जवळ आहेत अशा कार्यालयामध्ये बायोमेट्रीक हजेरी राबविण्यात येते.अतिदुर्गम, डोंगराळ भागात Network Connectivity नसल्यामुळे बायोमॅट्रिक प्रणालीद्वारे हजेरी प्रक्रिया राबविण्यास समस्या येऊ शकतात. तथापि, सध्यस्थितीत बहुतांश भागामध्ये Network Connectivity उपलब्ध आहे.त्यामुळे ज्या मौजा व सज्जा कार्यालया ह्या शहरी भागालगत आहेत, किंवा ज्या-ज्या ठिकाणी Network Connectivity उपलब्ध आहे अशा ठिकाणच्या मौजा व सज्जा कार्यालया मध्ये बायोमॅट्रिक/जीपीएस हजेरी प्रक्रिया राबविणे शक्य आहे.तरी ग्राम महसूल अधिकारी यांची बायोमॅट्रिक /जीपीएस हजेरी प्रणाली राबविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरुन करण्याबाबत उचित निर्णय घ्यावा व हजेरी घेण्यात यावी जेणे करून त्यांच्या कार्यालयीन कामात गतिमानता निर्माण होईल व जनतेची सेवा करण्याची संधी जास्त मिळेल अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरी समूह अहिल्यानगर महाराष्ट्र दिपक पाचपुते यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker