ताज्या घडामोडी

वरंध घाटातील अपघातग्रस्त प्रवाश्यांची मंत्री भरत गोगावले यांनी केली विचारपूस

रायगड – महाड एसटी डेपोच्या रामदास पठार ते महाड बस क्रमांक एमएच 20 बीएल 38 22 या एसटीला 15 मार्च रोजी महाडच्या दिशेने परतत असताना वरंध घाटात बेबीचा गोल ठिकाणी अपघात झाला. या अपघातात जवळपास 18 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहॆ. या सर्व जखमी प्रवाश्यांची फलोत्पादन, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी ट्रॉमा केअर सेंटर महाड येथे भेट देऊन विचारपूस केल. तसेच जखमीवर सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेतली.

सर्व जखमीना ट्रॉमा केअर सेंटर महाड येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तरी सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्राप्त झाली आहॆ. मंत्री श्री. गोगावले यांनी जखमींची विचारपूस केली आणि संबंधित डॉक्टरांकडून रुग्णांच्या उपचारासंबंधी माहिती घेतली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker