
पुणे: दशरथ तानाजी मोरे यांची वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे यांच्या खडकवासला मतदारसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. या निवडीबद्दल पुणे शहराध्यक्ष अजय भाऊ भालशंकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्ता शेंडगे, योगेश सुयवसे, रोहन गायकवाड, अमोल काळे आदी उपस्थित होते.
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने दशरथ तानाजी मोरे यांना पुणे शहरातील खडकवासला मतदारसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांचे हे पद नियुक्तीपत्रक दिनांक २६/७/२०२५ रोजी दिले गेले आहे.
दशरथ मोरे हे गेल्या पाच ते सात वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ते बाळासाहेब आंबेडकर यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि समाजातील अन्याय अत्याचारांविरुद्ध सातत्याने लढा देत असतात.
या नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, वंचित बहुजन सहकारी कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रथम लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून, अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन ट्रान्सपोर्ट व जनरल युनियनची स्थापना केली. या युनियनचे संस्थापक अध्यक्ष माननीय अँड. बाळासाहेब आंबेडकर हे अहोरात्र परिश्रम करून कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत. अँड. बाळासाहेब आंबेडकरांनी हाती घेतलेले हे कार्य मजबूत व बळकट करण्यासाठी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आपली वाटचाल सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दशरथ तानाजी मोरे यांना मिळालेल्या या पदासाठी नियुक्ती करण्यात येत असून, आपण अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठी उभे राहून संघटनेतील कामगारांना एकत्र करून त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
या नियुक्तीमुळे खडकवासला मतदारसंघातील कामगारांच्या प्रश्नांना वाचा फुटेल आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी दशरथ मोरे यांचे कार्य महत्त्वाचे ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



