
पुणे: सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे PoliticalNews राष्ट्रीय निमंत्रक आणि कायदेशीर सल्लागार, युवा नेते मंदार जोशी यांची देवाभाऊ फाउंडेशन या सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सहसमन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

समाजासाठी समर्पित PoliticalNews असलेल्या या संघटनेत श्री. जोशी यांच्या समावेशाने संघटनेची ताकद वाढेल, असा विश्वास देवाभाऊ फाउंडेशनने व्यक्त केला आहे. ही निवड करताना संघटनेला अत्यंत आनंद होत असून, आदरणीय देवाभाऊ यांच्या शिकवणीनुसार मंदार जोशी हे समाजासाठी आपले कार्य निष्ठापूर्वक सुरू ठेवतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

याचसोबत, PoliticalNews देवाभाऊ फाउंडेशनने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये इतर महत्त्वाच्या पदांवरही नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये अँड. मंदार जोशी यांच्यासह श्री. राहुल शहाणे, श्री. सिद्धार्थ कुलकर्णी, श्री. दीपक कोलते, श्री. राजू वाघ, श्री. आशुतोष घोलप, श्री. विवेक देशकर, श्री. श्रीकांत थिटे, आणि सौ. वृंदा लाड यांचा समावेश आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात सक्रिय राहून संघटनेची विचारधारा अधिक बळकट करावी, असे आवाहन संस्थापक मुख्य समन्वयक गजानन जोशी यांनी केले आहे.


हे सर्व नवनियुक्त पदाधिकारी संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी देवाभाऊ फाउंडेशनने हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.



