
मुंबई:– वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी Maratha reservation; मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे आणि मराठा समाजाच्या Maratha reservation; आरक्षणाचे ताट वेगळे असायला हवे. या दोघांना एकत्र करता येणार नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही, असा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल आणि त्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मान्यता, याचा आधार घेत त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले.
Watch full video here
https://www.facebook.com/PrakashAmbedkar.Official/videos/767200502684340/?mibextid=rS40aB7S9Ucbxw6v
सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
आंबेडकर यांच्या मते, महाराष्ट्र शासनाने जीआर (GR) च्या माध्यमातून Maratha reservation; मराठा आरक्षणाबाबत घेतलेला निर्णय हा कायदा आणि संविधानाला धरून नाही. ते म्हणाले की, “निजामी मराठा जो सत्तेत बसलेला आहे, त्याला गरीब मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावायचे आहे. सत्तेत असलेले मराठा ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावतात.” सरकार सर्व मराठा हे ओबीसी आहेत, अशी भूमिका घेत असल्याने ओबीसी समाज त्याला विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपवर गंभीर आरोप
याच संदर्भात, त्यांनी भाजपवरही गंभीर आरोप केले. “भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत आणि आरक्षण असूच नये असा गोंधळ घालायला सुरुवात केली आहे,” असे ते म्हणाले. Maratha reservation; भाजपचा डीएनए ओबीसी असल्याचा दावा केला जातो, पण ओबीसींचा सर्वात मोठा शत्रू भाजपच आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. मंडल कमिशन वाचवणे आता ओबीसींच्या हातात असून, त्यांनी आपले राजकीय अस्तित्व प्रस्थापित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
ओबीसींना राजकीय अस्तित्वासाठी आवाहन
आंबेडकर यांनी ओबीसींना आपले राजकीय अस्तित्व वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. Maratha reservation; “दोन-चार ओबीसी जिल्हा परिषदेला निवडून येण्यापेक्षा, सर्व बॉडीवर ओबीसी कसे निवडून येतील? असे प्रयत्न केले पाहिजेत.” ओबीसींना राजकीय धोका आहे, हे त्यांनी ओळखले पाहिजे. माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी 1990 साली लागू केलेला मंडल आयोग वाचवणे हे ओबीसींच्या हातात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी स्वतःच्या अधिकारांसाठी लढण्याचे आवाहनही केले आहे.



