
मुंबई:- तामिळनाडुतील नेल्लई जिल्हातील पलायम कोट्टई येथील सॉफ्टवेअर इंजिनिंअर असणाऱया दलित युवकांची झालेली हत्या हा ऑनरकिलिंगचा प्रकार आहे. या ऑनरकिलिंगच्या प्रकाराचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपण तीव निषेध करित आहोत. दलित युवक कवीन सेलवा यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
तामिळनाडु मधील नेल्लई जिल्हातील पलायम कोट्टई या गावातील सॉफ्टवेअर इंजीनिअर असणारा दलित तरुण कवीन सेलवा यांचे या गावातील सर्वंण मुलीशी प्रेम संबध होते.या सर्वंण मुलीशी कविन सेलवा लग्न करणार होते.जाती भेदाच्या द्वेषातुन मुलींच्या भावाने कविन सेलवा या दलित युवकांची दिवसा ढवल्या निघृन्ह हत्या केली. मुलीचे आई वडील दोघेही पोलिस अधिकारी आहेत .दलित युवकाचीं झालेली हत्या हा ऑनर किलिंगचा प्रकार आहे असे प्रकार पुन्हा घडु नये यासाठी तामिळनाडु सरकारने प्रयत्न केले पाहिजे.कविन सेलवा या दलित युवक हत्ये प्रकरणी अॅट्रोसिडी अॅक्ट गुन्हा दाखल झालेला आहे.आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडीत दलित कुटुंबाला तामिळनाडु सरकारने सांत्वनपर आर्थिक मदत केली पाहिजे.असे प्रकार पुन्हा घडु नये म्हणुन प्रयत्न केले पाहिजे.या दलित युवकाच्या हत्येचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव निषेध करित आहोत अशी भावना ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
ऑनर किलिंग हा सामाजिक रोग आहे. ऑनरकिलिंग चे वाढते प्रकार विकसित भारतावर डाग लावणारे आहेत .हे प्रकार रोखण्यासाठी सरकार काम करीत आहे.मात्र सरकारसोबत समाजाने ही पुढे येऊन ऑनर किलिंग साठी जबाबदार जातीभेद मिटविला पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले आहे.



