ताज्या घडामोडीराजकीय

भारताचे उपराष्ट्रपती 20 ते 22 मे 2025 दरम्यान गोवा दौऱ्यावर

उपराष्ट्रपती मुर्मूगांव बंदराला भेट देणार; नवीन प्रकल्पांचे करणार राष्ट्रार्पण

गोवा l भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड 20 ते 22 मे 2025 या तीन दिवसांसाठी गोवा दौऱ्यावर असणार आहेत.

या दौऱ्यात 21 मे रोजी उपराष्ट्रपती मुर्मूगांव बंदराला भेट देणार असून तिथे ते बंदराशी संबंधित नवीन प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करतील आणि मुर्मूगांव बंदर प्राधिकरणाचे वरीष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. मुर्मूगांव बंदरात असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजावरील वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबतही धनखड संवाद साधणार आहेत.

22 मे रोजी उपराष्ट्रपती भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयसीएआर) – केंद्रिय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेला (सीसीएआरआय) भेट देणार असून तिथे ते प्राध्यापक व शास्त्रज्ञांसोबत चर्चा करतील.

आपल्या गौवा दौऱ्यात उपराष्ट्रपती राज भवनालाही भेट देणार आहेत. राज भवन परिसरात ते चरक आणि सुश्रुत यांच्या पुतळ्यांचे अनावरण करतील. चरकांच्या आयुर्वेदातील आणि सुश्रुतांच्या शस्त्रक्रिया विद्येतील योगदानाच्या सन्मानार्थ हे पुतळे उभारण्यात आले आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker