
सातारा : भारताला २०४७ मध्ये स्वातंत्र्य मिळून १०० वर्षे पूर्ण होतील. या महत्त्वाकांक्षी टप्प्यावर विकसित भारतासोबतच विकसित महाराष्ट्राचे चित्र कसे असेल, याचा वेध घेणारे ‘विकसित महाराष्ट्र-२०४७‘ हे व्हिजन डॉक्युमेंट महाराष्ट्र शासन तयार करत आहे. या व्हिजनमध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा आणि प्राधान्यक्रम जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री महोदयांनी १७ जून २०२५ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत या अभियानाचे उद्घाटन केले.
सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी या सर्वेक्षणात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. राहणीमानाचा दर्जा, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि उपजीविकेच्या संधी यांसारख्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत, अपेक्षा, आकांक्षा आणि प्राधान्यक्रम नोंदवावे.
याव्यतिरिक्त, तुमच्या कल्पनेनुसार १० वर्षांनंतर आणि २०४७ मध्ये विकसित महाराष्ट्र कसा असावा, तसेच इतर कोणत्याही कल्पना किंवा विचार जे तुम्हाला मांडायचे असतील, ते सुचवावे असे आवाहन शासनाने केले आहे.
महाराष्ट्राच्या भविष्याला आकार देण्यासाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा क्यूआर कोड स्कॅन करून आपल्या कल्पना व विचार सुचवावेत:
* नागरिक सर्वेक्षण कालावधी: १८ जून ते १७ जुलै, २०२५
* सर्वेक्षण लिंक: http://wa.link/o93s9m
* सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा.
या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या आराखड्यास आकार देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



