ताज्या घडामोडीआपला जिल्हाराजकीय

कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या पूर्णा शहर अध्यक्षपदी प्रदीप नन्नवरे यांची नियुक्ती

पूर्णा: कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या पूर्णा शहर अध्यक्षपदी पत्रकार आयु.प्रदीप नन्नवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी ही घोषणा केली. प्रदीप नन्नवरे हे या न्यायालयीन लढ्यात सुरुवातीपासून सक्रिय आहेत.

पत्रकार आयु.प्रदीप नन्नवरे
पत्रकार आयु.प्रदीप नन्नवरे

यावेळी अभंग यांनी पुढे सांगितले की, भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण आणि जागेच्या मालकी हक्काचा प्रशासकीय आणि न्यायालयीन लढा प्रत्येक गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नेऊन जनजागृती केली जाईल. हा लढा समाजभिमुख व्हावा यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला लवकर निकाली निघावा यासाठी सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग
समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग

नियुक्त झालेले प्रदीप नन्नवरे हे सामाजिक कार्यकर्ते असून ते महाबोधी चॅनलचे पत्रकार आहेत. आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे आणि अनेक सामाजिक व धार्मिक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. या ऐतिहासिक न्यायालयीन लढ्यात प्रदीप नन्नवरे जनजागृतीचे काम तन, मन आणि सर्वस्व अर्पणून करतील, अशी अपेक्षा अभंग यांनी व्यक्त केली.

प्रदीप नन्नवरे यांच्या पुढील कार्यासाठी समितीने हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker