ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बार्शी पोलीस स्टेशन येथे बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव

बार्शी: बार्शी शहर पोलीस ठाण्यात अनेक वर्षांपासून जमा असलेल्या बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव २२ मे २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता होणार आहे. लिलावात मिळालेली रक्कम शासनाकडे जमा केली जाणार आहे.

लिलावासाठी इच्छुक व्यावसायिकांसाठी अटी व शर्ती:

* व्यावसायिकाकडे व्यवसायाचा परवाना आणि जीएसटी नंबर असणे आवश्यक आहे.

* इच्छुक व्यक्तींची नोंदणी २२ मे २०२५ रोजी सकाळी ८:०० ते ९:३० पर्यंत बार्शी शहर पोलीस ठाण्यात केली जाईल. त्यानंतर आलेल्या व्यक्तींना लिलावात सहभागी होता येणार नाही.

* लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल नसावा. गुन्हा दाखल असल्यास निकालाची प्रत सोबत आणावी.

* लिलावात भाग घेण्यासाठी अनामत रक्कम ५ लाख रुपये आहे.

* अनामत रकमेचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) “पोलीस निरीक्षक बार्शी शहर पोलीस ठाणे” यांच्या नावे असावा.

* बेवारस वाहने रस्त्यावर वापरण्यासाठी नाहीत. ती कटिंग करूनच पोलीस स्टेशनमधून घेऊन जावी लागतील.

इच्छुक व्यावसायिकांनी २२ मे २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता बार्शी शहर पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker