आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आरोग्य विभागाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

यवतमाळ: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजना, उपक्रम आणि उपलब्ध आरोग्य सेवा-सुविधांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्रे व इतर माध्यमांचा वापर करा, असे स्पष्ट निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

माध्यमांद्वारे आरोग्य कार्याचे वृत्तांकन महत्त्वाचे

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी नमूद केले की, राज्यात आरोग्याच्या अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत आणि रुग्णालयांमध्ये उत्तम सोयीसुविधा उपलब्ध आहेत. आरोग्य विभाग चांगले काम करत आहे, याचे माध्यमांद्वारे योग्य वृत्तांकन होणे आवश्यक आहे. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांचा त्वरित खुलासा करून सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकाऱ्यांनी अधिक सजग राहून कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जनजागृती उपक्रमांचा आढावा व प्रशिक्षणाचे निर्देश

मुंबई येथे आयोजित राज्यातील जिल्हा विस्तार व माध्यम अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत, आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विषयक जनजागृती आणि प्रसिद्धी उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण व अतिदुर्गम भागांमध्ये राबवण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमांची माहिती घेऊन, ते अधिक चांगल्या प्रकारे कसे राबवता येतील यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकाऱ्यांना माध्यमांद्वारे प्रभावीपणे काम करता यावे यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीला आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, सहायक संचालक डॉ. संजय कुमार जठार यांच्यासह सर्व जिल्ह्यातील जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker