
पुणे, ३० मे: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त उद्या, शुक्रवार, ३१ मे २०२५ रोजी सारसबाग येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, स्वारगेट, पुणे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उमेश कोकरे युवा मंच आणि मित्रपरिवार यांच्या सौजन्याने आयोजित या भव्य सोहळ्यात न्याय, शौर्य, सेवा आणि आदर्श नेतृत्व यांचा संगम असलेल्या अहिल्याबाईंच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे.

दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:
* सकाळी १० ते दुपारी ४: भव्य रक्तदान शिबिर
* सकाळी १० ते दुपारी ४: मोफत डोळे तपासणी शिबिर व चष्मे वाटप
* सकाळी १० ते दुपारी ४: भोजन समारंभ (कै. अनिताताई तनपुरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ)

* संध्याकाळी ५.०० वा.: स्मारक सजावट व रोषणाई
* संध्याकाळी ५ ते ७: भव्य मिरवणूक सोहळा
* रात्री ८ ते ९: स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
* रात्री ९ ते १०: प्रमुख मान्यवरांचे मनोगत व सत्कार समारंभ
प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.

या प्रेरणादायी सोहळ्यात पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



