
नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या वैधतेला आव्हान देणारी एक महत्त्वाची याचिका उद्या, सोमवारी (18 ऑगस्ट 2025) सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.
याचिकेमध्ये, सायंकाळी 6 वाजल्यानंतर मतदान झालेल्या 76 लाख मतांचा डेटा निवडणूक आयोगाने न ठेवल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. निवडणूक कायद्यांनुसार हा डेटा जतन करणे अनिवार्य असतानाही, तो उपलब्ध नसल्याने मतदानाच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर उद्या होणाऱ्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.



