
रायगड: दुर्गराज रायगडाच्या Raigad Fort निर्मितीमागे केवळ स्थापत्यशास्त्रच नव्हे, तर तत्कालीन अत्याधुनिक खगोलशास्त्रीय अभ्यासाचाही मोठा वाटा असावा, असा महत्त्वपूर्ण पुरावा समोर आला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन प्रक्रियेत गडावर एक प्राचीन ‘यंत्रराज’ सौम्ययंत्र (Astrolabe) हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे. या शोधाने इतिहास अभ्यासकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘यंत्रराज’ या नावानेही ओळखले जाणारे ‘ॲस्ट्रोलेब’ हे प्राचीन काळापासून ग्रहताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी वापरले जाणारे एक महत्त्वाचे उपकरण आहे. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यांसारख्या भौगोलिक आणि खगोलशास्त्रीय घटकांचा अभ्यास सुलभ करण्यासाठी या यंत्राचा वापर केला जात असे. दुर्गराज रायगडासारख्या Raigad Fort महत्त्वपूर्ण किल्ल्याच्या बांधकामादरम्यान खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची दाट शक्यता या शोधामुळे वर्तवली जात आहे.
मागील काही वर्षांपासून रायगडावर Raigad Fort विविध भागांमध्ये उत्खननाचे कार्य सुरू आहे. रोपवे अप्पर स्टेशनच्या मागील बाजूस ते कुशावर्त तलावापर्यंत आणि बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर या शिवकालीन वाड्यांच्या अवशेषांच्या जवळपास १० ते १२ ठिकाणी उत्खनन पूर्ण झाले आहे. याच उत्खनन मोहिमेदरम्यान, कुशावर्त तलावाच्या वरील भागात आणि पर्जन्यमापक व वाडेश्वर मंदिराच्या मधील भागात असलेल्या ऐतिहासिक वाड्याच्या जागेवर हे प्राचीन ‘यंत्रराज’ (ॲस्ट्रोलेब) खगोलशास्त्रीय उपकरण सापडले.
या यंत्रराजवर वरच्या बाजूस काही अक्षरे कोरलेली असून, मध्यभागी कासव/साप सदृश्य दोन प्राण्यांचे अंकन आहे. त्यांची मुख आणि शेपटी कुठल्या दिशेला असावी हे समजण्यासाठी ‘मुख’ आणि ‘पूंछ’ अशी अक्षरेही कोरलेली आहेत. या चिन्हांकित अक्षरांमुळे उत्तर आणि दक्षिण दिशांचा अंदाज बांधणे सोपे जात असावे, असे दिसते. Raigad Fort या अमूल्य शोधामुळे इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी एक मोठी आणि अनमोल संधी उपलब्ध झाली आहे. रायगडासारख्या Raigad Fort मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या किल्ल्याच्या निर्मितीमागील शास्त्रीय आणि खगोलशास्त्रीय पैलूंवर अधिक प्रकाश टाकण्यास हा शोध नक्कीच मदत करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.



