
पुणे – Prestige College जवळील कामठे वस्तीमध्ये खराब रस्त्यांमुळे हैराण झालेल्या सुमारे ५०० कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. अखेर या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून कामठे वस्तीमधील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. खड्डे आणि पावसाचे पाणी, चिख्खल यामुळे रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

या खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल नागरिकांनी वारंवार पुणे महानगरपालिकेच्या वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधला होता, परंतु त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
प्रसारित झालेल्या बातमीची लिंक खाली आहे. लिंक वर क्लिक करा व बातमी वाचा.
https://nirbhidvartmaan.in/?p=6514
‘निर्भिड वर्तमान‘ मुळे मिळाले यश

स्थानिक प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने, कामठे वस्तीतील नागरिकांनी ‘निर्भिड वर्तमान‘ या बातमीपत्राशी संपर्क साधून आपली समस्या मांडली होती.

‘निर्भिड वर्तमान’ने आपल्या “नीडर लेखनी, निष्पक्ष बातमी..!” या आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे तात्काळ या नागरिकांच्या समस्यांची दखल घेतली आणि बातमी मध्ये या परिस्थितीचे मुख्य कारण महानगरपालिका व स्थानिक नेते मंडळी दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट उल्लेख करत बातमी प्रसारित केली होती.

या बातमीची दखल घेत १४ तासात पुणे महानगरपालिका व स्थानिक नेते मंडळी यांना जाग आली असून याचा सकारात्मक परिणाम (इम्पॅक्ट) दिसून आला आहे. ‘निर्भिड वर्तमान’ने प्रसारित केलेल्या बातमीला यश मिळाले असून, प्रशासनाने याची दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले आहे.

यामुळे कामठे वस्तीतील नागरिकांनी ‘निर्भिड वर्तमान’ वृत्तसेवेचे आभार मानले आहेत. रस्त्याचे काम सुरू झाल्याने आता येथील नागरिकांना सुलभ प्रवासाचा अनुभव घेता येईल आणि खराब रस्त्यांमुळे होणारा त्रास थांबेल अशी अपेक्षा आहे.



