
संगमनेर: अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील यूनिटी हॉस्पिटलमध्ये एका महिलेवर झालेल्या अन्यायाच्या प्रकरणात कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी दिनांक ०६/०८/२०२५ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहेत. या प्रकरणी दोषी अधिकारी आणि हॉस्पिटलवर तात्काळ कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी:
पिडीत महिला यांनी २/०५/२०२५ रोजी संगमनेर येथील यूनिटी हॉस्पिटलवर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात त्यांनी ग्रामीण रुग्णालय, संगमनेर यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, ११/०५/२०२५ रोजी स्मरणपत्र आणि ०३/०६/२०२५ रोजी पुन्हा तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारींमध्ये नमूद केल्यानुसार, पीडित महिला यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास झाला, तसेच उपचारासंबंधी माहिती आणि बिल यात तफावत आढळली. ग्रामीण रुग्णालयाच्या तपासणी अहवालानुसार, बिलांमध्ये अनियमितता असल्याचे दिसून आले आहे

प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप:
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. शशिकांत दारोळे साहेब यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणी तक्रार दाखल होऊन दोन महिने उलटले तरीही ग्रामीण रुग्णालय, संगमनेर कार्यालय किंवा इतर संबंधित प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे, एका महिलेवर झालेल्या अन्यायाला न्याय देण्यासाठी प्रशासन अपयशी ठरले आहे.
उपोषण आणि मागण्या:
या प्रकरणावर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी दिनांक. ०६/०८/२०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
* यूनिटी हॉस्पिटल, संगमनेर येथील दोषी डॉक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
* संबंधित सरकारी अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचे दिसत असून, त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे.
* संगमनेरमधील सर्वसामान्य नागरिकांना लुबाडणाऱ्या या प्रकारावर तात्काळ कारवाई करावी.
* संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून जनतेला न्याय द्यावा.
या निवेदनाची प्रत आयुक्त तथा संचालक, आयुक्ताल्य आरोग्य सेवा भवन, मुंबई; उपसंचालक, आरोग्य मंडळ, नाशिक; जिल्हा शल्यचिकित्सक, अहमदनगर; आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, अहमदनगर यांना पाठवण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण हे अंतिम पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.



