
पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या सर्व परिमंडळांचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) आता थेट पोलीस ठाण्यांना भेट देणार आहेत. २७ मे ते २९ मे २०२५ या तीन दिवसांत ते त्यांच्या अखत्यारीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये उपस्थित राहून नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी आणि गुन्ह्यांची चौकशी करून त्यावर मार्गदर्शन करणार आहेत.
नागरिकांनी उपस्थित राहावे !
या विशेष भेटींदरम्यान, पोलीस उपायुक्त स्वतः पोलीस ठाण्यात उपस्थित राहून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करतील. ज्या नागरिकांचे अर्ज किंवा तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत, त्यांनी संबंधित दिवशी आपापल्या पोलीस ठाण्यात उपस्थित राहून आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून आपल्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करवून घेण्याची संधी मिळणार आहे.
तुमच्या पोलीस ठाण्याची भेट कधी?
मंगळवार, २७ मे २०२५
* परिमंडळ १: डेक्कन पोलीस ठाणे
* परिमंडळ २: सहकारनगर पोलीस ठाणे
* परिमंडळ ३: अलंकार पोलीस ठाणे
* परिमंडळ ४: बाणेर पोलीस ठाणे
* परिमंडळ ५: फुरसूंगी खडकी पोलीस ठाणे
बुधवार, २८ मे २०२५
* परिमंडळ १: समर्थ पोलीस ठाणे
* परिमंडळ २: स्वारगेट पोलीस ठाणे
* परिमंडळ ३: उत्तमनगर पोलीस ठाणे
* परिमंडळ ४: खडकी पोलीस ठाणे
* परिमंडळ ५: काळेपडळ पोलीस ठाणे
गुरुवार, २९ मे २०२५
* परिमंडळ १: विश्रामबाग पोलीस ठाणे
* परिमंडळ २: बंडगार्डन पोलीस ठाणे
* परिमंडळ ३: नांदेड सिटी पोलीस ठाणे
* परिमंडळ ४: विमानतळ पोलीस ठाणे
* परिमंडळ ५: हडपसर पोलीस ठाणे
या उपक्रमामुळे प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रलंबित प्रकरणे मांडण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे.



