ताज्या घडामोडीराजकीय

‘गृहनिर्माण धोरणाचा सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर कराण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई I मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘राज्य गृहनिर्माण धोरण – 2025‘ संदर्भात सादरीकरण बैठक संपन्न झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमक्ष गृहनिर्माण धोरणासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.

यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेला प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. हे धोरण सर्वसमावेशक असणार असून ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिला, विद्यार्थी आणि औद्योगिक कामगार अशा विविध समाजघटकांचा समावेश यात करण्यात आला आहे. राज्यातील वाढते शहरीकरण आणि घरांची वाढती मागणी लक्षात घेता, सर्व समाजघटकांसाठी सुरक्षित व परवडणारी घरे या धोरणाच्या माध्यमातून उपलब्ध होतील. प्रस्तावित गृहनिर्माण धोरणाचा सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्याच्या मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker